मय्यारानी उत्सव समिती जाम रोड यवतमाळ आणि हिंदवी प्रतिष्ठाण ने पटकावला यवतमाळ रामनवमी उत्सव २०२४ चा प्रथम क्रमांक.
मय्यारानी उत्सव समिती जाम रोड , यवतमाळ द्वारा रामनवमी निमित्य रॅली चे आयोजन प्रा आशिष महल्ले श्री राजू भाऊ गिरी आणि डॉ अनिल आखरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते.संपूर्ण यवतमाळ शहरातून तब्बल ७२ रॅली ने रामनवमी उत्सव २०२४ मध्ये सहभाग नोंदवला होता पैकी मय्यारानी उत्सव समिती जाम रोड , यवतमाळ आणि हिंदवी प्रतिष्ठाण ने आयोजित केलेल्या रॅली ने प्रथम क्रमांक पटकावला. चालत्या रॅली मध्ये मल्लखांब चे मनोरे करण्यात आले जे कि रामनावणी उत्सव २०२४ चे प्रमुख आकर्षण ठरले. तसेच ही रॅली वैद्यकीय क्षेत्रा मध्ये काम करणारेडॉक्टर्स ,परिचारिका साठी समर्पित करण्यात आली. या रॅली मध्ये हिंदवी प्रतिष्ठाण चे प्रमुख डॉ अनिल आखरे , डॉ प्रथमेश वानखेडे , डॉ नोमेश बोपचे उपस्थित होते. शहर वासिया कढून या रॅली ला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. रॅली च्या यशस्वी आयोजनासाठी साठी राजू भाऊ गिरी ,आशिष महल्ले ,आकाश भारती, प्रज्वल हूड, अक्षय हांडे, भुवन मेसेकर,गौरव राऊत,रुपेश गिरी, प्रतीक गिरी, कृष्णा थेटे,अनिकेत गोपाळे,विनीत पटेल, शुभम वानखडे,अनुराग गावंडे प्रणव पवार,सागर बावनकुळे,रोशन चोपडे,प्रणव क्षीरसागर, प्रज्वल डहाके यांनी विशेष मेहनत घेतली.
