रथ सप्तमी निमित्त यवतमाळ शहरात 15 ठिकाणी सामूहिक सूर्य नमस्कार कार्यक्रम यशस्वी झाला.
हा कार्यक्रम आरोग्य भारती, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. यावेळी आरोग्य भारती प्रांत सचिव डॉ प्रसाद बंसोड, आरोग्य भारती जिल्हा कार्याध्यक्ष डॉ अनिल आखरे, जनार्दन स्वामी योग अभ्यासक मंडळ अध्यक्ष श्री महेश जोशी क्रीडा भारती जिल्हा अध्यक्ष श्री अमोल देशमुख, डॉ ओंकार कोंडोलीकर, श्री शंकर ताटकर यांची उपस्थिती होती. यामध्ये जवळपास 460 लोक उपस्थित राहिले. प्रत्येक व्यक्तीने 13 असे एकूण 5980 सूर्य नमस्कार घालण्यात आले.यावेळी विविध राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विजेते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांना महेश जोशी आणि डॉ अनिल आखरे यांनी मार्गदर्शन केले. श्री मनीष गुबे यांनी प्रस्तावना आणि संचलन केले. डॉ प्रसाद बनसोड यांनी सुर्यनमस्काचे महत्त्व विषद करून कार्यक्रमाची सांगता केली!!
